वैफल्य, चिंताग्रस्त राज ठाकरेना उपचाराचीच गरज- खा. राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज ठाकरे हे त्यांचा अयोध्या दौरा रद्द झाला, म्हणून वैफल्य, चिंताग्रस्त आहेत. त्यांना आलेली निराशा त्यांच्या भाषणातून दिसून आली.  त्यांना उपचार करण्याची गरज असल्याचे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे.

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार होते. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा भाजप पुरस्कृत होता. त्यांना रामाच्या भेटीसाठी जाण्यापासून रोखणार कोण? हट्टाने अयोध्येला गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असते, असे राज ठाकरे पुण्यातल्या सभेत हताशपणे म्हणाले.

आपल्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधापाठीमागची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली. माझ्या अयोध्या दौऱ्याविषयी सापळा रचला गेला. दिल्ली आणि विशेषत: महाराष्ट्रात त्याचा प्लॅनिंग होऊन दौऱ्याविरोधात महाराष्ट्रातूनच मदत केली गेली, तर मदत पुरवणारे कोण? उत्तर प्रदेशात तर भाजपच्या योगींचे सरकार असल्यावर मनसैनिकांवर गुन्हे कोण दाखल करणार? असे एक ना अनेक प्रश्न   खा.संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेतील वक्तव्यावर   उपस्थित केले आहेत.

राज ठाकरेंनी  काय करणार, काय करतात यावर बोला, शिवसेनेच्या हिंदुत्वावर तर बोलूच नये. काही दिवसांपासून ते हिंदुत्वावर बोलत आहेत. सोयीनुसार हिंदुत्वाचे दुकान उघडले असून  मुळात हिंदुत्वाशी त्यांचा संबंध तरी आला का? अयोध्या वारी, राम मंदिर यावर बोलताना त्यांनी आपला मागचा इतिहास पहावा, त्यांनी हिंदुत्वाची शाल कधीपासून पांघरली, एकदा का माणसाला नैराश्य किंवा वैफल्यग्रस्तता आली कि तो काहीही बोलतो. तसेच त्यांचे आहे. वैफल्य, चिंताग्रस्त असल्यामुळे त्यांनी एखाद्या चांगल्या काऊन्सिलरकडे दाखवावं. माणसाला एकदा निराशेने ग्रासलं की तो काहीही बोलतो. असेही खा. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना खोचक टोले दिले आहेत.

Protected Content