पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पंडित टेळे (रा. निमडाळे, जि. धुळे) हा तरुण आपल्या दुचाकीवरून (एमएच ०४ एचव्ही ७७५३) जात असताना, पुढे चालणाऱ्या ट्रकने (एमच १८ बीजी ५३९६) अचानक ब्रेक दाबले. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी दुचाकी थेट ट्रकवर आदळली.

या धडकेत उमेश चौधरी यांच्या डाव्या हाताला, दोन्ही पायांना तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी उमेश टेळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



