जळगावात किरीटभाईंची भागवत कथा : जाणून घ्या संपूर्ण दिनक्रम !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने शहरात ख्यातनाम कथाकार प.पू. किरीटभाई यांच्या श्रीमद भागवद कथेचे आयोजन करण्यात आले असून यात प्रत्येक दिवसाला स्वतंत्र कार्यक्रम पार पडणार आहेत.

जळगाव शहरातील सागर पार्कच्या भव्य मैदानावर दिनांक ६ ते १२ ऑक्टोबरच्या दरम्यान किरीटभाई यांची श्रीमद भागवत कथा पार पडणार आहे. यात कथेसोबत विविध सांस्कृतीक कार्यक्रम देखील आयोजीत करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने-

दि. ६.९०.२०२३ रोजी सकाळी ९० ते १२ च्या दरम्यान शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर,

प्रथम दिवस :- गुरूपादुक पुजन , गणेश पुजन

व्दितीस दिवस :- मंगळागोरी पुजा हळदी कुंकू,

तृतीय दिवस :- श्रीकृष्ण जन्मोत्सव

चतुर्थ दिवस :- दही हंडी,मनोरथ, यमुना लोटी मनोरथ , सुदामा मिलन

पंचम दिवस :- महारास , पृष्टीमार्गमनोरथ, सांझी उत्सव , गोवर्धन पुजा

षष्ट दिवस :- कृष्ण-रुक्मीणी विवाह

सप्तम दिवस :- पूर्णाहुती

या प्रकारे सात दिवस स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत.

दरम्यान, या भागवत कथेमध्ये ज्ञान यज्ञासोबत सात दिवसीय पितृमोक्षीय हवन आणि पुर्वजांच्या नावाने पोथीस्थापनाचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच, नैमिषारण्यातून सप्त वैदीक ब्राम्हणाव्दारे यंज्ञ व पुजा विधी होणार आहे ज्यांना या पुजेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयोजकांशी ९७०८७०७०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर भागवत कथा सागरपार्क येथे आयोजित केली असून तेथे भव्य मोठा मंडप जर्मन डोम टाकण्यात येणार आहे. या कार्यक्रमास दररोज अंदाजे ७ ते ८ हजारावर भाविक येण्याची शकयता असून त्यासाठी विविध समित्यामध्ये स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी स्वयंसेवकांना बाराकोड पास दिले जातील. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आज आमदार राजूमामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सदर भागवत कथेच्या आयोजनासाठी आ.राजुमामा भोळे यांचे अनमोल सहकार्य लाभत असून सोबत ललीतभाऊ कोल्हे यांचेसुध्दा मोलाचे सहकार्य मिळत आहे. कार्यक्रमाचे आयोजक सुजित चौधरी, सुनिल चौधरी , विशाल भोळे, पियुष कोल्हे, तुलसी परिवार युवक एकता मित्र मंडळ आणि लालबाग मित्र मंडळ हे आहेत. जळगाव जिल्हातील नागरिकांनी भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

खालील व्हिडीओत पहा आ. राजूमामा भोळे यांची पत्रकार परिषद

Protected Content

%d bloggers like this: