कौशल्य विकास अंतर्गत महीला नव उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलांना उद्योग व्यवसाया च्या माध्यमातुन आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या वतीने उद्योजकता आणि लघुव्यवसाय विकासासाठी कार्यरत राष्ट्रीय संस्था, एनआईईएसबीयुडी,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या मार्फत डांभुर्णी तालुका यावल येथे अनेक महिला नव उद्योजकांच्या उपस्थित उद्योजकता विकास कार्यक्रम पार पडला.

तालुक्यातील डांभुर्णी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मोठया संख्ये उद्योग व्यवसायासाठीअग्रेसर असलेल्या या महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमास बार्टीचे जळगाव जिल्हा प्रकल्प अधिकारी युनुस तडवी यांनी नवउद्योजक निर्माण होतांना येणार्‍या अडचणी व उद्योग क्षेत्रातील विविध पायर्‍या या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बार्टी व विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमास निसबड चे कार्यक्रम अधिकारी विनोद टाक, (निसबड दिल्ली),कार्यक्रम अधिकारी श्रीमती दिपिका शर्मा (निसबड दिल्ली),आसरा मल्टिपर्पज फॉऊंडेशन चे संचालक राहुल बावीस्कर,उप संचालक मनोज सोनवणे,कवीर इंटरप्रायजेस चे संचालक निकिता राठोड,समन्वयक कादर तडवी,राहुल निंबाळकर,खैरून तडवी,दोसा अडकमोल,मोना तडवी तसेच तालुक्यातील बहुसंख्येने प्रशिक्षणार्थी महिला मोठया संख्येत उपस्थित होत्या.

या भारत सरकारच्या कौशल्य विकास एंव उद्यमशिलता संकल्प कार्यक्रमा व्दारे दिनांक१४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान नवउद्योग व्यवसायिकांना उद्यम आधार प्रमाणपत्र,औषद्य व अन्न प्रमाणपत्र, ऑफीस बॅग,तिन दिवस उद्योग आणि व्यवसायीकांना मार्गदर्शन तसेच मुख्यमंत्री एमआईएसटी या योजने अंतर्गत कर्ज,मुद्रा लोनअशा विविध योजनांच्या लाभ मिळवण्या बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Protected Content