उच्च न्यायालयाच्या दणक्याने मिळणार टोकरे कोळी प्रमाणपत्र

प्रकिता सूर्यवंशी हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | घरात कुणाचीही वैधता नसतांना जुन्या १९०९ मधील कागपत्रांच्या नोंदीवरून प्रकिता किशोर सूर्यवंशी हिला टोकरे कोळी जात वैधता प्रमाणपत्र अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धुळे यांनी तातडीने द्यावे असा महत्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच दिला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की मेडिकलला प्रवेश घेणारी विद्यार्थिनी प्रकिता किशोर सूर्यवंशी हिचा टोकरे कोळी जातीचा दावा अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीने फेटाळला होता. जातपडताळणी समितीच्या सदर आदेशास मुलीचे वडील किशोर सुर्यवंशी यांनी ऍड मोहनिश थोरात यांच्या मार्फत मा उच्च न्यायालया औरंगाबाद येथे आव्हान दिले होते.

सदर केस मध्ये मुलीच्या परिवारात कुणाकडेही जात वैधता नव्हती पण ऍड मोहनिश थोरात यांनी सन १९०९ मधील जुन्या कागपत्रांच्या आधारे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सदर विद्यार्थिनीला मेडिकल साठीच्या प्रवेशा साठी तातडीने सुनावणी घेत तात्काळ टोकरे कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या या पथदर्शी निकालाने टोकरे कोळी जमातीतील प्रकिता किशोर सूर्यवंशी हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सदर निकालामुळे जात वैधतेच्या प्रतीक्षेत असणार्‍या टोकरे कोळी बांधवांमध्ये उत्साह पसरलेला आहे.

Protected Content

%d bloggers like this: