ब्रेकींग : राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस उलटली : दोन प्रवासी ठार

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळकोठा येथे राष्ट्रीय महामार्गवरून जाणारी खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात बारा प्रवासी जखमी झाले असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर पिंपळकोठा गावाजवळ आज मोठा अपघात झाला. यात एरंडोल ते जळगाव दरम्यान पिंपळकोठा गावाजवळ ३० प्रवासी असलेल्या स्लीपर लक्झरीचा अपघात झाल्याने २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर प्रवासी जखमी झाल्याची घटना सकाळी साडेनऊच्या समारास घडले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे.

या संदर्भात माहिती अशी की, जळगाव ते एरंडोल दरम्यान असलेल्या पिंपळकोठा गावाजवळ चौधरी कंपनीच्या लक्झरी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस ही नाल्याच्या खाली जाऊन कोसळल्याची घटना शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार दुभाजकावर आदळल्यामुळे हा अपघात झाला. यात बसमधील बारा प्रवासी जखमी झाली असून यातील दोघे जण ठार झाले आहेत.

जखमी प्रवाशांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालय आणि जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यास मदत केली.
या अपघातात दिपेंद्र कुमार, दिनेश कुमार, रतनलाल कुमावत, जयराम कुंभार, महादेव कुंभार, राजेंद्र प्रजापती, सिताराम कुमार, मुकेश गुजर, लक्ष्मी जांगेड आणि दोन अनोळखी असे १२ जण जखमी झाले आहे. शेवटची वृत्त हाती आले तेव्हा एरंडोल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

संबंधीत बस ही श्री चौधरी ट्रॅव्हल्स या कंपनीची होती. या बसचा क्रमांक एआर ०१ वाय ०००९ हा होता. पोलिसांनी या संदर्भात बस चालकाकडून माहिती मिळवून तपास करण्यास प्रारंभ केला आहे. तर, जखमी प्रवाशांच्या आप्तांना देखील माहिती देण्यात आली आहे.

Protected Content