संजय निराधार योजनेतील प्रकरणे मंजूर करा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार योजनांची प्रकरणे गेल्या अनेक महिन्यांपासून जामनेर तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. योजना मंजूर न झाल्याने गरजूंना या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ही प्रकरणे तातडीने मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने शुक्रवार २३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जामनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामनेर तालुक्यातील संजय निराधार योजनेतील विधवा, जेष्ठ नागरिक यांच्यासह विविध लाभार्थ्यांनी आपली प्रकरणे अनेक दिवसांपासून जामनेर तहसील कार्यालया पडून आहेत. तहसील कार्यालयात संजय निराधार समिती नसल्यामुळे ही प्रकरणे मंजूर होत नाही. त्यामुळे लाभार्थी सदर शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहे. त्यामुळे जोपर्यंत संजय निराधार समिती स्थापन होत नाही, तोपर्यंत तहसीलदार यांनी प्रकरणाची चौकशी करून ते पास करावे व लाभार्थ्यांना लाभ द्यावा. मागणीचे लेखी निवेदन जामनेर तालुका युवा सेनेच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे दिली आहे. निवेदन देताना युवा सेना उपजिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, ॲड. प्रकाश पाटील, सुधाकर सराफ, नरेंद्र धुमाळ, विशाल भोई, अतुल सोनवणे, सुरेश चव्हाण, खुशाल पवार, कैलास माळी, दीपक माळी, उस्मान शेख, अमोल रोकडे, जितू झाल्टे, गोपाल सूर्यवंशी, पवन माळी, शेख इस्माईल, शेख मुजीत, शेख शब्बीर शेख, इम्रान खान यांच्या युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content