जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा

जळगाव प्रतिनिधी । कोविड-१९च्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमिवर जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना ३ ऑगस्टपासून ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी देण्यात आली आहे.

सध्या सुरू असणार्‍या कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर अनेक खासगी कंपन्यांनी घरूनच काम म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. काही शासकीय खात्यांनीही मर्यादीत प्रमाणात का होईना या प्रकारात कामाला परवानगी दिली आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेतही ‘वर्क फ्रॉम होम’ला परवानगी देण्यात आली आहे. सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी याबाबतचे निर्देश आज जारी केले आहेत.

या निर्देशानुसार, जिल्हा परिषदेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपत्कालीन सेवा वगळता अन्य सर्व कर्मचारी ३ ते ८ ऑगस्टच्या दरम्यान घरूनच कामे करू शकतात. यानंतर १० ऑगस्टपासून मात्र जिल्हा परिषदेतील कामे ही कार्यालयातच नियमितपणे सुरू होणार असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content