अनलॉक ३.० जाहीर : जाणून घ्या काय सुरू होणार तर काय बंद राहणार ?

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ३.० चे दिशानिर्देश जाहीर केले असून यात कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरूच राहणार आहे. तर व्यायामशाळा व योगवर्गांचा खुलण्याचा मार्ग मात्र मोकळा करण्यात आला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ३.० चे दिशानिर्देश जाहीर केले आहेत. यानुसार रात्रीची संचारबंदी उठविण्यात आली आहे. यामुळे रात्री फिरण्यावरील बंदी उठणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळांना ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नव्या दिशा-निर्देशांनुसार कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी मेट्रो सेवा, थिएटर, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार सुरु केले जाऊ शकतात. मात्र या सेवा सुरु करण्याच्या तारखा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच जाहीर केल्या जातील.

दरम्यान, वंदे भारत मोहिमेअंतर्गत मर्यादित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यात आल्या आहेत. इतर आंतरराष्ट्रीय उड्डाणं टप्प्याटप्याने सुरु केले जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत स्वातंत्र्यदिनच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. तथापि, अनलॉक ३.० च्या अंतर्गत कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. शैक्षणिक संस्था, देवस्थाने, थिएटर, क्रीडांगणे, रेल्वे व बससेवा आदी बाबी आधीप्रमाणेच बंद राहणार आहेत.

Protected Content