पापड खाल्ल्याने कोरोना बरा होतो, सांगणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक होईल, असा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

 

काही दिवसांपूर्वी अर्जुन मेघवाल पापड खाण्याचा सल्ला दिल्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत काही दिवसांपूर्वी भाभीजी पापड या ब्रँडचं उद्घाटन करत असताना मेघवाल यांनी…भाभीजी पापड खाल्ल्यामुळे करोना विषाणूशी लढण्यास मदत होते असे विधान केले होते. या पापडांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होईल असेही मेघवाल म्हणाले होते. शनिवारी मेघवाल यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपला करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याच्या वृत्ताला मेघवाल यांनी दुजोरा दिला आहे. अवजड उद्योग आणि संसदीय कामकाज या दोन विभागांचे राज्यमंत्री पद हे मेघवाल यांच्याकडे आहे.

Protected Content