पाचोरा प्रशासनाच्या दुर्लक्षाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात (व्हीडीओ)

pachora

पाचोरा (प्रतिनिधी) बाहेरपूरा भागातील कामगार कल्याण केंद्रा समोरील सम्राट अशोक नगर गेटजवळ मुतारी व गटारीचे पाणी रस्त्यावरती येत असल्याने त्या प्रभागाच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु, या गंभीर बाबीकडे स्थानिक नगरसेवक व नगरपालिकातील साफ सफाई कर्मचारी हे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे नागरिक तक्रार करीत आहेत.

 

नगर पालिकेत सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्ष तसेच स्वच्छता विभागात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात असंतोष असल्याची प्रतिक्रिया स्थानीक नागरिक देत आहेत. तरी तात्काळ नगरपालिका स्वच्छता विभागातील अधिकारी यांनी गटारी व मुतारी स्वच्छ करून त्याचे घाणीचे साम्राज्य असलेले पाणी हे रस्त्यावर येऊ नये व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

 

पहा । प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात

Add Comment

Protected Content