…आणि ज्ञानेश्वर मुळेंनी धरला लेझिमवर ताल (व्हीडीओ)

mule sir

कोल्हापुर (वृत्तसंस्था) सेवा निवृत्ती नंतर अनेक सरकारी कर्मचारी घरी आराम अथवा नातवंडांना खेळवण्यात आपला वेळ घालवत असतांना सर्जनशील लेखक आणि परराष्ट्र मंत्रालयातून सचिव पदावरुन सेवानिवृत्त झालेले ज्ञानेश्वर मुळे मात्र अपवाद ठरले आहेत. सेवा निवृत्ती नंतर त्यांनी घरी शांत न बसता समाजातील चांगुलपणा वाढीस लागावा याकरिता अस्तितत्वात आलेल्या ‘ चांगुलपणाची चळवळ’ या राष्ट्रीय चळवळीचा आरंभ केला असून त्याद्वारे महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये व्याख्यान, जागृती सुरु केलेली आहे.

 

या अंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील काही ग्रामिण भागातील गावांना त्यांनी भेटी दिल्या. कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील मजले गावाला भेट दिली असता तेथिल एका मुलींच्या शाळेत मुळे सरांचा जाण्याचा प्रसंग आहे. शाळेत गेल्यावर तेथेच मुली लेझिम खेळत होत्या. हे पाहून मुळे सरांना पण लेझीम खेळण्याचा मोह आवरला नाही. वास्तवीक मुळे सरांच बरच आयुष्य हे परदेशात गेलेले आहे. पण तरीही महाराष्ट्रीय लेझीम विसरलेले नाहीत. ज्ञानेश्वर मुळेंसोबत लेझीम खेळतांना मुली फारच आनंदल्या होत्या. मुळे लेझिम खेळतांनाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे.

पहा । ज्ञानेश्वर मुळेंनी धरला लेझिमच्या तालावर घेतला ठेका

Add Comment

Protected Content