सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान असते तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती

THAKRE

 

मुंबई (वृत्तसंस्था) महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंच्या कामाला मी नाकारत नाही. गांधी आणि नेहरूंनी देशासाठी योगदान दिले आहे. मात्र इतर कोणीही राष्ट्राच्या विकासात योगदान दिले नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. तसेच सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती. असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

 

लेखक विक्रम संपथ यांच्या ‘सावरकर इकोज फ्रॉम अ फॉरगाटेन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे पुढे म्हणाले की, देशासाठी काही काळ नेहरूंनी तुरूंगवास भोगल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. मी त्यांना सागू इच्छीतो की सावरकर यांनी 14 वर्षांचा तुरूंगवास भोगला आहे आणि त्यांनी मरणयातनादेखील भोगल्या आहेत. जर नेहरूंनी अशा यातना भोगल्या असत्या आणि ते 14 मिनिटांसाठी जरी तुरूंगात गेले असते तरी त्यांना नायक म्हणण्यास आमची हरकत नव्हती, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. तसेच त्यांना या पुस्तकाची प्रत दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान, ठाकरे यांनी सावकरांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याला ‘पिकनिक स्पॉट’ मध्ये रुपांतरित करणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

Protected Content