राष्ट्रपतीनी घरी जाऊन लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिला

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतरत्न हा देशाचा सर्वाच्च्‍ा नागरी सन्मान आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ३१ मार्च रोजी आज देशाचा सर्वाच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रोपती मूर्म यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांन सन्मानित केले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.  अडवाणी यांच्या प्रकृती अवस्थेमुळे हा निर्णय घेण्यात आला असे वृत्त समोर आले आहे. ३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी भारतरत्न देण्याची घोषणा केली होती.

राष्ट्रपतींनी ३० मार्च रोजी राष्ट्रपती भवनात ४ व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केले. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात चारही व्यक्तींच्या कुटुंबीयांना हा सन्मान मिळाला. नरसिंह राव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी राष्ट्रपतींकडून हा सन्मान स्वीकारला.

Protected Content