मिरवणूकीत वाद्य वाजविल्याप्रकरणी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकीत वाद्य वाजविल्याप्रकरणी शहरातील नवीपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजीनदार, सचिव, सल्लागार व कार्यकर्त्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल होवून पोलीस उपअधीक्षकांपर्यंत पोहचला होता, त्यानुसार शहर पोलिसांनी केलेल्या तपासणीत तो नवीपेठ मित्र मंडळाचा असल्याने निष्पन्न झाल्याने बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना फेसबुकच्या माध्यामातून गणेश मंडळांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यात कार्यकर्ते वाद्य वाजविण्यासह नाचतांनाचा व्हिडीओ प्राप्त झाला होता. हा व्हिडीओ त्यांनी पुढील तपासासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण निकम यांना पाठवून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अरुण निकम यांच्यासह कर्मचार्‍यांनी सदरील व्हिडीओवरुन हद्दीतील गणेश मंडळांचा शोध घेतला असता व्हिडीओत जागा नवीपेठेतील सारस्वत चौकाकडून जयप्रकाश नारायण चौकाकडे जाणारा रस्ता दिसून येत होता. तसेच आठ ते दहा कार्येकर्ते नाचतांना दिसून येते होते. त्यानुसार पोलिसांनी खात्री करुन केली असता, सदरचे सार्वजनिक गणेश मंडळ हे नवीपेठ मित्र मंडळ असल्याचे निष्पन्न झाले होते.

यांच्यावर गुन्हा दाखल
नवीपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद नारायण अग्रवाल, उपाध्यक्ष मनिष शामसुंदर झंवर, खजीनदार विनोद अशोक मुंदडा, सचिव सुनील सुरेश जोशी, सल्लागार अमोल राजेंद्र जोशी, मिरवणुकीत नाचणारे कार्यकत, वाद्य वाजविणारे तसेच वाहनमालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वाद्य ताशा तसेच मिरवणुकी वाहन तीनचाकी रिक्षाही जप्त करण्यात येणार आहे.

Protected Content