काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये ऑनलाइन रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची थीम देण्यात आली होती.

ऑनलाइन रांगोळी स्पर्धेत इयत्ता पहिलीसाठी फुलांची रांगोळी इयत्ता २री साठी कार्टून ची रांगोळी व तिसरी साठी ठिपक्यांची रांगोळी आणि चौथी व पाचवी साठी संस्कार भारती ची रांगोळी असे विषय विद्यार्थ्यांना देऊन ऑनलाइन पद्धतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया, समन्वयिका स्वाती अहिरराव या उपस्थित होत्या. या स्पर्धेचे प्रमुख रवींद्र भोईटे, संतोष शिरसाळे हे होते. तर या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक रजनी टोके, वैशाली जाधव, शिल्पा मांडे, अशालता, साळी, प्रदीप पाटील, समाधान पाटील, नरेंद्र भोई ,अरूण पाटिल यांचे सहकार्य लाभले. शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content