भाजीपाला विक्रेत्याची रिक्षा चोरणार्‍या दोन संशयितांना अटक

जळगाव प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर लावलेली भाजीपाला विक्रेत्याची रिक्षा चोरणार्‍या दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली.  न्यायालयाने दोघाची कारागृहात रवानगी केली आहे.

अधिक माहिती अशी की,  गोपाल युवराज चौधरी (रा. आसोदा ता.जि.जळगाव ह.मु. खेडी रोड परिसरातील ज्ञानदेव नगर) येथे वास्तव्यास आहेत. ते रिक्षाचालक असून ते ६ मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या रिक्षाने (एमएच १९ व्ही ३६८८) भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची रिक्षा भाजीपाला मार्केटच्या बाहेर असलेल्या रोहीणी स्वीट मार्टच्या बाजूला उभी केली होती. भाजीपाला घेऊन बाहेर आल्यावर रिक्षा चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी गोपाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यातील संशयिताबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार शिकारे यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, ,मुदस्सर काजी ,योगेश बारी ,इम्रान सय्यद जमीर शेख यांच्या पथकाला सुचना केल्या. पथकाने शाहरुख जहुर खाटीक (तांबापुरा  जळगाव) आणि फारुख शेख मुस्तफा (रजा कॉलनी, शेरा चौक मेहरुण जळगाव) या दोघांना आज रविवारी अटक केली. न्यायालयाने दोघाची कारागृहात रवानगी केली आहे.

Protected Content