कोरोना : जिल्ह्यात आज दोन बाधित रुग्ण आढळले तर दोन रुग्णांनी केली मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात दोन बाधित रूग्ण आढळून आले तर दोन बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करुन सुखरुप घरी पोहोचले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी दिली आहे.

जळगाव शहरात एक तर तालुक्यात एक असे दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७५२ बाधित रुग्ण आढळून आले आहे  यापैकी १ लाख ४० हजार १६२ रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १५ रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Protected Content