राष्ट्रवादीत कार्यकर्त्यावर अन्याय होत नाही, याचे मी उदाहरण- विनोद देशमुख

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याच कार्यकर्त्यावर अन्याय होत नाही. चुकूनही असे काही घडले तर पक्षाचे सारे नेते खंबीरपणे अन्याय मोडून काढण्यासाठी उभे राहतात. याचे मी उदाहरण आहे. असे प्रतिपादन आज विनोद देशमुख यांनी केले. 

जवळपास आठ महिन्यांपुर्वी काही आरोपावरून विनोद देशमुख यांना निलंबित करण्यात आले होते. आज त्यांना जिल्हाध्यक्ष ॲङ रविंद्रभैय्या पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना विनोद देशमुख पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मी सक्रीय होतो. मधला काही काळ फक्त पक्ष कार्यालयात येत नव्हतो. त्यानंतर माझे निलंबन झाले. मात्र या पक्षाशी माझी नाळ तुटलेली नव्हती. आता वरिष्ठ नेत्यांनी सगळ्या परिस्थितीचा व माझ्या कामांचा  विचार करून आज पुन्हा पक्षात घेतले. आता यापुढे पक्ष संघटन मजबूत करणे हेच काम करीत राहिल. अगदी राज्याच्या सत्तेचा पाया पक्षाच्या प्रत्येक कॉलनीतील शाखेत असतो. त्यामुळे शाखा अभारणी करून कार्यकर्त्यांचे जाळे वाढविणे, मतभेद न ठेवता काहीही गटबाजी न करता पक्ष पुढे नेण्यासाठी मी कार्यकर्त्यांच्या सोबत राहिल. या पक्षात आपल्याबद्दल चूक होत आहे. अशी भीती कुणी ठेवू नये अशी भिती असणाऱ्यांना मी माझे उदाहरण देतो. प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या कामाची पावती या पक्षात नेत्यांकडून मिळतेच. असेही ते म्हणाले. 

केंद्रातील सरकारच्या विरोधात आंदोलने करतांना मी असे म्हणेल की, आमच्या पक्षात संघटनात्मक विकेंद्रीकरण झाले पाहिजे. विविध विषय घेवून विविध आघाड्यांच्या प्रमुखांनी आंदोलने करून त्रासदास मुद्दे समाजासमोर ज्वलंतपणे आणले पाहिजे. त्यातूनच राष्ट्रवादी कॉग्रेसला आपला प्रभाव कसा वाढविता येईल यासाठी आमच्या पक्षाचे नेते सोबत आहेत. विविध आघाड्यांच्या प्रमखांना त्यांच्या आघाडीची प्रत्येक स्तरावरची कार्यकारीणी निवडण्याचे जसे स्वातंत्र्य असते. तसेच स्वातंत्र्य त्यांना आंदोलनासाठी विषय निवडण्याचेही असते. जनतेचे कित्येक प्रश्न आहेत. त्यातला एकेएक प्रश्न विविध आघाड्यांच्या प्रमुखांनी आंदोलनासाठी निवडावा. सातत्याने सत्ताधाऱ्यांच्या चुका जनतेसमोर जाणे अत्यंत महत्वाचे आहे. या चुका प्रभावीपणे मांडतांना राष्ट्रवादी काँग्रेसला व्यापक जनाधार मिळविण्याचे नियोजन आमच्या नेत्यांनी केलेले आहे. असेही ते म्हणाले.

 

Protected Content