चिलगाव सरपंचपदासाठी मनिषा बागुल यांची उमेदवारी

शेंदुर्णी/जामनेर, -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चिलगावातून मनीषा ज्ञानेश्‍वर बागूल यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.

सध्या ग्रामपंचायात निवडणुकीची धामधुम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक २ रोजी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली. यामध्ये तालुक्यातील चिलगांव येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने पॅनल प्रमुख बापु बागुल यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर तहसिल येथे सरपंच पदासाठी मनिषा ज्ञानेश्वर बागुल यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला.

दरम्यान, याच पॅनलतर्फे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी प्रशांत ज्ञानेश्वर पाटील; दिपाली मधुकर मानकर; उषा विलास पाटील; विठ्ठल लोटन पाटील, प्रियंका राहुल बाविस्कर, मनोज जनार्दन सरोदे; किशोर जुलाल पाटील; ज्ञानेश्वर भास्कर पाटील, शितल संदिप चव्हाण, दिपक बुधा निकम, आशा रफीक तडवी आणि सोमय्या गुलाब तडवी यांनी अर्ज दाखल केला.

याप्रसंगी विलास पाटील, सरपंच परीषदेचे जिल्हाध्यक्ष बाळु धुमाळ, गोंदेगांव येथील सरपंच देवानंद भाऊ, सुभाष पाटील, आधार निकम, सुपडु तडवी, दिनकर बागुल, पवन पाटील, गजानन पाटील, अमोल औटे, गोपाल सुतार गजानन सरोदे, शशिकांत निकम, संभाजी सरोदे, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content