जळगाव काँग्रेस कमिटीतर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी  । येथे जळगाव जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांची पुण्यतिथीनिमित्ताने  शुक्रवार २१ मे रोजी कॉंग्रेस भवनात अभिवादन करण्यात आले. 

 

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील , आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,  डॉ.ए.जी.भंगाळे, उदय पाटील, अजबराव पाटील यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  स्व.राजीव गांधी हे तळागाळातील कार्यकर्त्यांची दखल घेत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असत. दिवंगत राजीव गांधी यांना जाऊन तीन दशके झाली तरी आठवणी मनात आहेत. स्व राजीव गांधी यांच्या कार्यकर्तृत्वावर माहिती विषद केली. तसेच रुग्णांना जेवणाचे पाकिटे व माक्स वाटप करण्यात आले असून यावेळी  श्यामकांत तायडे, देवेंद्र मराठे,  वासुदेव महाजन,  विरेंद्रसिंघ पाटील, मुक्तदिर देशमुख, मनोज सोनवणे, जमील शेख, प्रदिप सोनवणे, दिपक सोनवणे, अमजद खान पठाण, जगदीश गाढे, जलील पटेल, नदीम शेख, जाकीर बागवान यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content