धक्कादायक : फेसबुकवरून मैत्री करणे महिलेला पडले महागात; अत्याचारातून महिला गर्भवती

भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

भडगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फेसबुकवरून ओळखी निर्माण करत लग्नाचे आमिष दाखवत परराज्यातील महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनीवारी २१ जानेवारी रोजी भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भडगाव शहरातील सागर भिमा वैद्य याने गुजरात राज्यातील एका २६ वर्षीय महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. दोघांचे मैत्रीत रूपांतर झाले. यानंतर सागर वैद्य याने महिलेला नाशिक येथे बोलावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. एवढेच नाही तर महिलेसोबत काढलेले फोटो मित्रांना पाठविले. या अत्याचारात महिला गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, महिला गरोदर असल्याचे समजताचा संशयित आरोपी सागर भिमा वैद्य हा पळून गेला. महिलेने अखेर भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून सागर विरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून शनिवारी २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content