Home Cities पाचोरा पाचोरा राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे वृक्षारोपण

पाचोरा राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे वृक्षारोपण


पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीतर्फे खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भास्कर नगरमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सदरचे वृक्षारोपण हे ज्योती संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरला पाटील, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा रेखा देवरे, शहराध्यक्षा सुनिता देवरे, जयश्री मिस्तरी, सुरेखा पाटील, भारती देशमुख, अनिता देवरे, सुनिता पाटील, प्रतिभा पाटील, निर्मला खैरनार, सुनिता वारुळे, दिपमाला पाटील, आशा जोगी आदींचे महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound