टाकरखेडा शाळेत जिजाऊ जयंती आणि विवेकानंद जयंती साजरी

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | टाकरखेडा येथील जि.प. मराठी शाळेत राष्ट्रमाता जिजामाता तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रूपाली उघडे या होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजामाता तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी एकूण ३५ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. इयता २ री ते ७ वीच्या प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विजयी स्पर्धकांना शालेय प्रमाणपत्र शाळेतर्फे देण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने टाकरखेडा येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते सातवी च्या  वर्गातील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत शाळेतर्फे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मयुर पाटील, नवलसिंग पाटील यांनी भाषणे केली. कार्यक्रम प्रसंगी जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती नवलसिंग पाटील,स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मयुर पाटील, उपसरपंच धर्मराज शिंदे, माजी सरपंच समाधान पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोनाली गोसावी, सदस्य हुसेना तडवी, आशा सपकाळ, निवृत्ती आगळे, भारत पाटील, सुभाष भोई, आत्माराम सुरळकर, गोपाल दांडगे, पोलीस पाटील समाधान पाटील, सोपान डोंगरे, संजय भोई, अजय उघडे, प्रकाश कोते, सुधाकर गोसावी, ईश्वर चौधरी, गणेश केणे, नारायण लोहार, भाऊराव उघडे, उत्तम भोई, कमलाकर सुरळकर, लक्ष्मी भोई, राणी लोहार, मुकेश वाघ, मुकेश ठाकूर, अशोक भोई, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पाटील व अक्षरा पडोळ या विद्यार्थींनी केले व आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक जयंत शेळके, श्रीमती जयश्री, श्रीमती छाया पारधे, श्रीमती निर्मला महाजन, नाना धनगर, रामेश्वर आहेर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content