आरएमबी जळगावच्या वतीने ‘बिझीनेस समिट २०२३’ आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रोटरी मिन्स बिझीनेस जळगाव चॅप्टरच्या वतीने ‘उत्तर महाराष्ट्रातील पहिले बी टू बी बिझिनेस समिट २०२३’ चे आयोजन भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या (MACCIA) संयूक्त विद्यमाने येत्या ४ नोव्हेंबर रोजी, हॉटेल प्रेसिडेंट येथे करण्यात येत आहे. या समिट निमित्त माहितीपूर्ण स्टॉल्स देखील असतील.

रोटरी इंटरनॅशनलच्या सामाजिक कार्याची सर्वांना कल्पना आहेच. रोटरी इंटरनॅशनल विविध शाखांपैकीच एक ‘ रोटरी मिन्स बिझीनेस जळगाव चॅप्टर ‘ ला नुकतीच सुरुवात झाली असून त्यातून शहराच्या व्यवसाय वाढीस वेगळे काय करता येईल या विषयांवर विविध मीटिंगस मधून विचार विनिमय  होत आहे. या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडसट्रीज अँड अग्रिकल्चर हे मार्गदर्शन करणार असून भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे उप प्रबंधक मनोजकुमार सहयोगी यांचे देखील विविध प्रोत्साहनपर योजना या विषयावर विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी माहितीपूर्ण सेमिनार देखील आयोजित करण्यात आले आहे.

ज्यात विविध बँका, महामंडळ त्यांच्या तर्फे राबविणाऱ्या योजनांची माहिती देणार आहेत. हे समिट विविध उद्योग व सेवा क्षेत्रातील उद्योजक व्यावसायिक यांच्या करीता पर्वणी ठरणार असल्याची माहिती दीपककुमार पाटील यांनी हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव डॉ राहुल भन्साळी, खजिनदार स्वप्नील जाखेटे, जनसंपर्क संचालक मनीष पात्रीकर, प्रवेश मुंदडा, मितेश पलोड, मितेश शाह, डॉ मोनिका जाधव,  भद्रेश शाह, डॉ नीरज अग्रवाल, धरम सांखला व गिरीश शिंदे उपस्थित होते.

Protected Content