दुकानात चोरी करतांना कामगारालाच पकडले रंगेहात; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । बळीरामपेठेतील दुकानमालक काही कामानिमित्त बाहेर गेले असता दुकानातील काम करणार्‍या नोकरांना चोरी करतांना रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास बळीरामपेठेत घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधीकॉलनी परिसरातील कंवरनगरातील रहिवासी मुकेश अर्जुनदास बाधवाणी (वय ४३) यांचे बळीरामपेठेत सतनाम हॅण्डूम नावाचे दुकान आहे या दुकानावर किरण दत्तू नन्नवरे व पंकज राजू मोळी हे दोघ गेल्या तीन वर्षांपासून कामाला आहे. आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बाधवाणी यांनी दुकान उघडले. त्यानंतद दुपारी २ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुकानासमोरील दुकानात ते भेटण्यासाठी गेले. त्यांना भेटून ते १० मिनिटात परत आले असता, त्यांना दुकानाच्या बाहेर पंकज कोळी हा मोटारसायकलवर बसून व त्याच्या मागे एक अनोळखी मुलगा बसलेला होता. त्यांच्याकडे युरीयाची व एक दुकानातील लेडीज गारमेंटची गोणी होती. त्यांनी बाधवाणी यांना बघताच एमएच १९ एएल १६६५ क्रमांकाच्या दुचाकीने पळून जात होते.

पंकज व त्याच्या साथीदार दुचाकीवर पळून जात असतांना बाधवाणी यांना आराडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी आजूबाजूचे दुकानदार मुकेश समदाणी, अमर कुकरेजा, मयुरवा बाधवाणी, दिलीप कटारीया यांनी त्या दोघांना पकडून ठेवले.

पंकज कोळी याने गेल्या काही दिवसांपूर्वी दुकानात चोरी केली होती. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता परंतु बाधवानी यांनी त्यावेळी तक्रार दाखल केली नव्हती. परंतु आत पुन्हा पंकज कोळी व किरण दत्तू नन्नवरे यांनी दुकानातील स्कार्फ गोणीत भरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. त्यांनी दुकानातील सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा माल चोरी करुन घेवून जात असतांना रंगेहाथ पकडले. दरम्यान किरण दत्तू नन्नवरे, पंकज राजू कोळी दोघ रा. जैनाबाद व राकेश प्रताप सपकाळे रा. दिनकर नगर यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content