ब्रेकींग : लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक; जळगाव एसीबीची कारवाई

पारोळा/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तक्रारदारासह नातेवाईकांना अटक न करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर न पाठविण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची लाच घेतांना पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जयवंत प्रल्हाद पाटील (वय-५४) असे  अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोप पत्र लवकर न पाठविण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडे ३० हजारांची मागणी केली. यापुर्वी पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडून २० हजार रूपये घेतले. उर्वरित १० हजार नंतर घेवून असे सांगितले. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी सापळा रचला. यात तक्रारदाकडून तडजोडअंती ८ हजारा रूपये स्विकारतांना पोलीस उपनिरीक्षकाल रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर यांनी ही कारवाई केली.

Protected Content