फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

धनाजी नाना महाविद्यालय,फैजपुर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात शरद महाजन,अध्यक्ष, वैद्यकीय आणि तंत्र शिक्षण संस्था न्हावी, यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी वाणिज्य शाखेतील संशोधक प्राध्यापकांनी व्यवस्थापनातील त्रुटींवर अभ्यास करून देशाला आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने नवीन तंत्र विकसित करण्यासाठी संशोधन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली, संशोधक प्राध्यापकांनी परिषदेत मांडलेल्या विचारांचे कौतुक केले आणि कोविड नंतरच्या काळात वाणिज्य आणि व्यवस्थापनाचे महत्व पटवून दिले.

समारोप समारंभाचे अध्यक्ष के आर चौधरी, उपाध्यक्ष, तापी परिसर विद्यामंडळ, फैजपुर, यांनी राष्ट्रीय पातळीवर परिषदेच्या अयोजनाबाबत महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचे आणि महाविद्यालयाचे कौतुक केले.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरविंद चौधरी यांनी अधिवेशनाच्या माध्यमातून संघटन मजबूत होते व व्यप्ती वाढत जाते असे मत व्यक्त केले, प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्वि-दिवसीय ‘राष्ट्रीय परिषदेचे’ समन्वयक उपप्राचार्य डॉ. ए.आय.भंगाळे,यांनी मांडले, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व तापी परिसर विद्यामंडळ,फैजपुर च्या कार्यकारी मंडळाने राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी सहमती देत सर्वोतोपरी सहकार्य केले त्याबद्दल  आभार मानले,

डॉ.जी.वाय. शितोडे यांनी विविध  पूरस्कार जाहीर केले. त्यात. प्राचार्य डॉ.माधवी कुलकर्णी यांना डॉ.पी सी शेजवलकर आणि महादेव तल्हार आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रा.अशोक कोकाटे, यांना सौरव शिवरे स्मृती तरुण संशोधक पुरस्कार, डॉ.अशोक कोकाटे, व डॉ.निषेश विलेकर,यांना स्वप्नील ललवाणी स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट संशोधक व आलेख वाचक पुरस्कार देण्यात आला, तसेच डॉ.पी.एम.शहा व डॉ. बी.व्ही.नाईक यांना लोकसेवक मधुकरराव चौधरी स्मृती प्रित्यर्थ जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.जी. एम.तल्हारे,अध्यक्ष.बी बी तायवाडे, कार्यअध्यक्ष.डॉ.आर के टेलर, सचिव डॉ.जी.वाय.शितोडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अहवाल वाचन प्रा.डॉ.श्याम साळुंके यांनी केले, तर डॉ. पी. वाय. कालवरकर, डॉ.निशिकांत झा, डॉ. संजय रामराजे, यांनी परिषदेच्या अयोजनाविषयी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन डॉ.राजश्री नेमाडे, डॉ. आर.आर.राजपूत, डॉ. सीमा बारी यांनी व आभार डॉ. जी. जी. कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यांत सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.

 

Protected Content