शिवसेनेची गुजराती मतदारांना साद ! : विशेष मेळाव्याचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी । आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून यासाठी शिवसेना मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपाच्या तगड्या आव्हानासमोर शिवसेनेनं मुंबई महापालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी गुजराती मतदारांना आकर्षीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 100 गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

Protected Content