शिंदे गटात भूकंप; आमदाराने भरला उमेदवारी अर्ज

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ऐन लोकसभा निवडणूकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणूकीसाठी आपला अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेना शिंदे गटात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी बंडखोरी करून विदयमान खासदारांविरूध्द हे पाऊल उचलले आहे.

बुलढाण्यात लोकसभा निवडणूकीसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी २ उमेदवारी अर्ज भरले आहे. यापैकी एक अर्ज त्यांनी शिवसेनेचा डमी उमेदवार म्हणून भरला असून, दुसरा उमेदवार अपक्ष म्हणून भरला आहे. सध्या बुलढाण्याचे प्रतापराव जाधव खासदार आहे. याठिकाणी कुणाला उमेदवारी मिळते हे स्पष्ट झालेले नाही आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीला मोठा झटका बसला आहे.

Protected Content