इस्त्री करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील ५७ वर्षीय व्यक्तीला कपड्यांना इस्त्री करतांना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय माधवराव साळुंखे वय ५७ रा. खेडगाव ता.चाळीसगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय साळुंखे हे आपल्या परिवारासह चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवार २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता कपड्यांना इस्त्री मारण्याचे काम करत होते. त्यावेळी त्यांचा अचानक विजेचा धक्का बसल्याचे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनवर तडवी हे करीत आहे.

Protected Content