विजय कॉलनीत घरफोडी; ४ लाख ३० हजाराचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विजय कॉलनी येथील प्रसाद आपार्टमेंटमधील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरूवार ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश नारायण व्यास (वय-४९) रा. प्रसाद अपार्टमेंट, विजय कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एका हॉटेलात मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत. गुरूवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास ते कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेर गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर गणेश व्यास यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहे.

Protected Content