लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर वारंवर अत्याचार

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे अमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर पिडीत महिला गर्भवती झाल्याने तिचा गर्भपात केला आणि  नंतर तिच्याच कडून ४ लाख रूपये घेवून परत करण्यास नकार देत महिलेचा आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरात ४३ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्या महिलेची चाळीसगाव शहरातील मिलगेट परिसरात राहणारा निरंजन अशोक लद्दे याच्याशी ओळखी निर्माण झाली. त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवत १९९८ पासून वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून महिला गरोदर राहिल्याने तिचा एका खासगी रूग्णालया गर्भपात केला. त्यानंतर २००० मध्ये मला अडचण आहे असे सांगून निरंजन याने महिलेकडून सोन्याची चैन आणि सोन्याची अंगठी असा एकुण ४ लाख रूपये घेतले. दरम्यान, पिडीत महिलेने पैसे मागितले असता , ४ मार्च रोजी निरंजन याने आत्महत्या करण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी निरंजन लद्दे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहे.

Protected Content