विजय कुरकुरे यांना कृषीभूषण एक्सलन्स पुरस्कार

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फेडरेशन कृषीभूषण महाराष्ट्र स्टार्ट अपच्या वतीन कृषी भूषण एक्सलन्स पुरस्कार २०२४ वितरण सोहळा २४ मार्च रोजी २०२४ रोजी रविवारी दुपारी एक वाजता मराठा विदया प्रसारकाचे के.बीही. इंजिनिअरिंग महाविदयालय नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार वितरण सोहळात पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पुरस्कार देऊन हा भव्य-दिव्य सोहळा पार पाडला. या सोहळयास राज्यातील कृषी विस्तार क्षेत्रातील तज्ञ मंडळी आणि कृषी व्यवसायिक उद्योजक यांना पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये जळगाव जिल्हयातील साकेगावाचे रहिवासी प्रा. विजय संतोज कुरकुरे यांना कृषीभूषण एक्सलन्स पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांचे विविध संशोधन पत्र, कृती आणि लेख विविध मासिकांमध्ये प्रकाशित होत असतात. प्रा. कुरकुरे सध्या शेतकरी उत्पादक कंपनी यावर संशोधन करत आहे. ते मातोश्री व्यवस्थापन महाविदयालय आणि संशोधन केंद्र येथे कार्यरत आहे.

Protected Content