वरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्ताने आज गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील यांनी वरणगाव ता.भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सर्वप्रथम डॉ केतकी ताई पाटील यांनी पती डॉ वैभव पाटील यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. यावेळी हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, सुनील काळे (माजी नगराध्यक्ष) भरत चौधरी (ए पी आय), मिलिंद भैसे (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,) ऋषीकेश महाजन (समाजसेवक)
नाना चौधरी (प्रवासी संघटनेचे अध्यक्ष), ऍड.ए.जी. जंजाळे (कायदे आघाडी जिल्हा उपाध्यक्ष), राजेश चौधरी (शाखा उपाध्यक्ष) सुशील झोपे (शेतकी संघ संचालक), गोलू राणे (ओबीसी मोर्चा अध्यक्ष), अनिल वंजारी, रमेश पालवे, मयूर शेळके, विवेक चौधरी, लीलाधर चौधरी, दीपक चौधरी, तेजस जैन, फझल मोहम्मद, अजमल खान, मुस्लिम अन्सारी, साबीर कुरेशी, राजा अलीम, दादू पालवे, भूषण माळी, कृष्णा पाटील, अश्फाक काजी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content