महापौर भोळे , महायुतीच्या सर्व नगरसेविकांनी सांभाळली आ. भोळे यांच्या प्रचाराची धुरा

WhatsApp Image 2019 10 10 at 7.55.45 PM

जळगाव, प्रतिनिधी | महायुतीचे अधिकृत उमेदवार व आ. सुरेश भोळे यांच्या प्रचाराच्या रॅली सुरु झाल्या आहेत. जळगाव शहराच्या महापौर सीमा भोळे व भाजपाच्या सर्व नगरसेविका व महिला पदाधिकारी यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली असून या सर्व महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. प्रचाराची धुरा आमदार भोळे यांच्या धर्मपत्नी सीमा भोळेंनी घेतली आहे. त्या शहरातील विविध भागातील प्रचार रॅलीत सहभागी घेत असून ठिकठिकाणी महिलांच्या कॉर्नर बैठका घेत आहेत.

गुरुवार १० ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता विठ्ठल मंदिर- झिपरू अण्णा शाळा- ममता बेकरी पोलीस लाईन विठ्ठल भाऊ पाटील यांचे घर- म.न.पा शाळा रजा कॉलनी दिलीप आबा यांच्या चौकात साहित्य नगर येथे समारोप होवून दिलीप आबा यांच्या चौकात सभा घेण्यात आली. तर दुपारी श्रीइच्छादेवी मंदिर चौक, ते शिरसोली रोड ने शहीद अब्दुल हमीद चौक- शामा फायर ते मेहरूण रोडने तांबापुरा, सदोना वेयर हाऊस समोरून पटेल गल्ली, गवळी वाडा श्रीकृष्ण मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिरसोली रोड ने गुरुद्वारा ते शिरसोली नाका ते मेहरूण नगरसेवक सदाशिवराव ढेकळे यांचे कार्यालय मच्छी बाजार, जुम्मा शहा बखार समोरून बिलालचौक ते गुलाबबाबा कॉलनी, महादेव मंदिर, साईबाबा मंदिर जयजवान चौक, नेताजी चौक श्रीराम मंदिर तलाठी कार्यालय, पिरजादे वाडा-कुंभार वाडा, दीपमाला किराणा, पाण्याच्या हौद्कडून विठ्ठल महाजन यांच्या घराकडून भवानी मंदिर – नगरसेवक सुनील महाजन यांच्या घरी समारोप झाला.

या रॅलीप्रसंगी मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, मंडल अध्यक्ष प्रदीप रोटे, मनपा प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, विनोद मराठे, संजय विसपुते नगरसेविका जिजाबाई भापसे, जयश्री महाजन, शबनाबी शेख, ज्योती चव्हाण, सभापती रंजना वानखेडे, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, रेश्मा काळे, मीनाक्षी पाटील, रेखा पाटील, सुरेखा तायडे, उषा पाटील, पार्वताबाई भिल, प्रतिभा देशमुख, शोभा बारी ,प्रतिभा कापसे, अॅड. सुचिता हाडा, रंजना सपकाळे, मीना सपकाळे, गायत्री शिंदे, कांचन सोनवणे, प्रिया जोहरे, सरिता नेरकर, रुकसाना बी खान, नगरसेवक गणेश सोनवणे, प्रशांत नाईक किसन पाटील, दिलीप आबा सोनवणे, बाळासाहेब सोनावणे, जगदीश राठोड, प्रकाश चव्हाण, प्रकाश राठोड, सागर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दरबार जाधव आदी उपस्थित होते.

Protected Content