कोरोना : आयुक्त कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी महापालिका आयुक्त सतीष कुलकर्णी , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.

जळगाव जिल्हयातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांना यथोचित आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी इन्सिडेंट कमांडर यांची नियुक्ती केली आहे. यात महापालिका आयुक्त सतीष कुलकर्णी यांना शहर महानगरपालिका कार्यक्षेत्राकरीता आरोग्य सुविधांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करणे व सर्व संबंधित यंत्रणा , घटक यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याकरीता इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची महापालिका क्षेत्र वगळून उर्वरित जळगाव जिल्हा यात नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रासह आरोग्य सुविधांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करणे व सर्व संबंधित यंत्रणा , घटक यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याकरीता इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Protected Content