जामनेर येथील शाळेत गणपती बनविण्याचे प्रशिक्षण

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी येथील विद्याभारती देवगिरी प्रांत संलग्नित, लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल येथे शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

संपूर्ण देशभरामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व समाज वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असतो. आज आपल्या जामनेर शहरातील लिटील नेस्ट माय छोटा स्कूल या प्री- स्कूलमध्ये  शाळेच्या शिक्षिकाच्या माध्यमातून गणपती कसा बनवायचा याचा प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणपती बनवण्यास सुरुवात केली. लिटिल नेस्ट माय छोटा स्कूलमधील विद्यार्थ्यांनी छान अशा गणपतीच्या मुर्ती बनवल्या. त्यानंतर शाळेच्या प्राचार्य केतकी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. गणपती मूर्ती बनविण्यासाठीच्या कार्यशाळेला सहकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content