चोपडा येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उद्या ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी । महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे श्रावण मासारंभानिमित्त कारोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कविसंमेलन ‘काव्य मैफल- रंगपावसाचे’ या कार्यक्रमाचे आयोजन उद्या २१ जुलै रोजी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे श्रावण मासारंभानिमित्त कारोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्य मैफलीत महाराष्ट्र साहित्य परिषद सदस्य ‘पाऊस’ या विषयाशी संबंधित स्वरचित तसेच मराठीतील नामवंत कवींच्या कविता, काव्यवाचन सादर करणार जाणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही काव्यमैफल संपन्न होणार आहे.

ही काव्य मैफल मंगळवारी २१ जुलै रोजी रात्री ९ वाजता गुगल मीटवर होणार असून त्यासाठी https://meet.google.com/qgj-sndm-syh ही लिंक असल्याचे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. काव्य मैफल सर्वांसाठी खुली असून ज्या रसिकांना या श्रावणसरींचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी वेळे अगोदर सहभागी व्हावे, असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी केले आहे.

Protected Content