गरुड महाविद्यालयाच्या १९९८च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा

शेंदुर्णी, प्रतिनिधी | वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत असणारे, त्याचप्रमाणे गावातच असून शेती, व्यापार ,व्यवसाय सांभाळून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथील सन १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांची भेट घेत महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

एकूण पन्नास माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय भोळे हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी चांगले मित्र आयुष्यात असल्यास कोणत्याही संकटाची पर्वा करण्याची गरज नाही अशी भावना व्यक्त केली. तसेच माजी विद्यार्थी संघाने केलेल्या कार्याचा गुणगौरव करत सर्वांनी भविष्यातही महाविद्यालयाशी संपर्कात राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद सोनवणे यांनी या सर्व विद्यार्थ्यांसोबत असलेल्या पारिवारिक संबंधांची आठवण करून दिली तसेच भविष्यातही आपण अशाच कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. माजी विद्यार्थी संघ समन्वयक डॉ. योगिता चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात सुषमा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाप्रति ऋण व्यक्त केले. कार्यक्रमात विशेष म्हणजे विठ्ठल लोखंडे , निवृत्त सैनिक यांचा विशेष सत्कार करीत देशाप्रती त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी मोहन पाटील , सतीश पाटील यांचे अनमोल सहकार्य कार्यक्रमास लाभले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्व विभागांना भेट देत त्या काळात ही वास्तू आमची शाळा होती आज तिचे महाविद्यालयात रूपांतरण झाले आहे आणि याच महाविद्यालयाची झालेली प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयराव गरुड, संस्थेचे सचिव दाजीसाहेब सतीश चन्द्र काशीद, कै.आचार्य गजाननराव गरुड यांच्या कन्या आणि संस्थेच्या संचालिका सौ. उज्वलाताई काशीद, सहसचिव दीपक गरुड वस्तीगृह सचिव कैलास देशमुख तसेच संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हीं. आर. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Protected Content