अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : संविधान बचाव नागरी कृती समितीची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । शहरात मुलींवर अन्याय अत्याचार करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे पोलीस अधीक्षकांकडे आज करण्यात आली.

रविवारी तांबापुर येथील अल्पवयीन मुलीला ती काम करीत असलेल्या ठिकाणावरून तिला उचलून घेऊन गेल्यानंतर ही मुलगी परत घरी न आल्याबद्दल पालकांनी रामानंदनगर पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. त्या मुलीचे डेड बॉडी सोमवारी सकाळी मेहरून तलाव येथे संशयास्पद मिळून आल्याने सदर मुलीवर अपहरण केलेल्याने अन्याय अत्याचार केला असावा व जीवाशी मारले असावे असा कयास व्यक्त करण्यात केला. याबाबत सविस्तर चौकशी होऊन आरोपी कडक शिक्षा व्हावी यासाठी तसेच जळगावात मागील तीन-चार दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना अल्पवयीन मुलीसोबत घडल्या असून त्या प्रकरणात सुद्धा पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची भेट संविधान बचाव कृती समितीतर्फे घेण्यात आली. समितीमध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक, मौलाना आझाद विचार मंचचे अब्दुल करीम सालार, आंबेडकरवादी समितीचे मुकुंद सपकाळे, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे व मानियार बिरदारीचे प्रदेश अध्यक्ष फारूक शेख यांनी पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेटून घेऊन चर्चा करून कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी त्वरित तिघीसंबंधित तपासणी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले व लवकरात लवकर सदर प्रकरण तपास करून आरोपीला कठोर कारवाई होईल या हिशोबाने दोषारोपण तयार करण्याचे आदेश दिले.

Protected Content