रासायनिक खतांसाठी रावेर, सावदा व निंभोरा येथे रेल्वे रॅक उपलब्ध करा; खासदार रक्षा खडसे यांना निवेदन

सावदा प्रतिनिधी । रावेर-यावल तालुक्यात शेतकऱ्यांना रासायनिक खते लवकर उपलब होण्यासाठी रावेर, सावादा व निंभोरा येथे रेल्वे रॅक पॉइंटची मागणी रावेल तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने खासदार रक्षा खडसे यांच्याकडे करण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त रासायनिक खतांची उचल केली जाते व जिल्ह्यात रावेर, यावल भागात केळी व इतर बागायती पिकांमुळे बारामाही रासायनिक खतांचा पुरवठा जिल्ह्यात सर्वात जास्त असतो. जळगाव जिल्ह्यात असलेले जळगाव शहर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर हे सर्व पॉईंट जळगाव लोकसभा क्षेत्रात येतात. मात्र वर्षाचा अनेकदा या पॉईंटवरून अंतर जास्त असल्याने रावेर येथे खतांचा पाहिजे. प्रमाणावर पुरवठा होत नसल्याने आपल्या भागात खतांची टंचाई निर्माण होते किंवा जास्त गाडी भाडे देऊन खते द्यावी लागतात. याच अनुषंगाने जळगाव ऐवजी या क्षेत्रात ब्रेक घेऊन वाहतूक सुलभ करता येते. रावेर यावल तालुक्यात जळगाव रंग पॉईंटवर अवलंबून राहावे लागते. वास्तविक रावेर, सावदा व निंभोरा येथे रेल्वेचे स्वतंत्र केळी वॅगनसाठी बनवलेले प्लॅटफॉर्म असून 2013 पासून केळी वॅगनबंद झाल्याने सदर प्लॅटफॉर्म रिकामे पडून आहेत. ठिकाणी हा प्रेक्षकची व्यवस्था करण्यात येईल, केळीच्या वाहतुकीसाठी आपला यावल, रावेर तालुक्यातून दररोज 200 ते 400 खेळींचे ट्रकपर्यंत रवाना होतात. त्यामुळे आपल्या परिसरात स्थानिक वाहतुकीसाठी या ट्रकचा वापर होऊन कमी वाहतुकीस रासायनिक खते उपलब्ध होतील. सोबतच भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर हे तीन तालुके 50 किलोमीटरच्या आत असल्याने या भागातही कमी वेळेत रासायनिक खतांचा पुरवठा होईल. या परिसरात दररोज रोजगाराची संधी निर्माण होईल तरी आपण रेल्वे मंत्रालय व भुसावळ रेल्वे विभागाची पत्रव्यवहार करावा, अशी मागणी रावेर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने खासदार रक्षाताई खडसे यांना निवेदनाद्वारे केली.

Protected Content