खत वाटप करण्या बाबत विक्रेत्यांना सक्त सूचना ; रविंद्र पाटलांच्या मागणीला यश

यावल प्रतिनिधी– शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्या संदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हातील सर्व खत विक्रेत्यांना शेतकऱ्यांना तात्काळ सक्तीच्या सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

जळगांव जिल्ह्यात शेजाऱ्यांना खत मिळण्यासाठी सकाळी 5 वाजे पासून रांगेत उभे रहावे लागते आहे तसेच यंदा पाऊस चांगला झाला असला तरी शेतकऱ्यांना खत मिळण्यास विलंब होत आहे तरी शेतकऱ्यांना तात्काळ खत उपलब्ध व्हावीत या मागणी संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद सुर्यभान पाटील यांनी दि 16 रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवेदन सादर केले होते त्या निवेदनाची दखल घेत शेतकऱ्यांना योग्य प्रकारे खत विक्री संदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना डिलर्स मार्फत खत पुरवठा सुरळीत सुरू झाला असून जुलै महिनाअखेर पुरेश्या प्रमाणात खते उपलब्ध होतील तसेच शेतकऱ्यांना सर्व विक्रेत्यांनी योग्य प्रकारे खत विक्री करावी असे लेखी पत्र जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी वैभव दत्तात्रेय शिंदे यांनी दिले आहे. शेतकऱ्यांनी गर्दी न करता खत खरेदी सोशल डिस्टन्सिंग पाळून खरेदी करावी असे आवाहन शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी केले आहे

Protected Content