चोपडा येथील पंकज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी महाविद्यालयाला भेट

clg


 

चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आज दि. 5 सप्टेंबर रोजी जळगावातील गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, चेअरमन डॉ. सुरेश पंडीत बोरोले व संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांच्या मार्गदर्शनाने पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल नेहमीच अनोखे उपक्रम राबवित असते. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित न राहता पुस्तकी ज्ञानाचा पलीकडे जाऊन ज्ञान ग्रहण केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना दादासाहेब व भैय्यासाहेब नेहमीच प्रोत्साहित करत असतात. व नेहमी भविष्याचा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करावी. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील संपूर्ण माहिती मिळावी, यासाठी दरवर्षी वैद्यकीय विद्यालयात भेट देण्यासाठी ते नेहमी आग्रह होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गोदावरी वैद्यकीय विद्यालयात विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले. यावेळेस त्या ठिकाणी असलेले अधिकारी भिडे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. व प्रत्येक विभागाचे कार्य कसे चालते, याविषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विविध विभागांना भेट दिली. व त्यांनी त्याकाही प्रात्यक्षिके करून दाखवली. यात सिटीस्कॅन मशीनमध्ये झोपून विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. त्याचप्रमाणे ICU नेफ्रोलाईन, रेडिओलाँजी इ.विभागांना भेट देऊन सविस्तर माहिती मिळवली व आपल्या ज्ञानात भर घातली. प्राचार्य मिलिंद पाटील यांनी या सहलीचे आयोजन केले होते.

 

Protected Content