डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी केले शालेय कामकाज (व्हिडीओ)

dr

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात आज दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी या दिनाचे औचित्य साधत संपुर्ण शालेय कामकाज सांभाळले आहे.

याबाबत माहिती अशी की, शाळेतील तीन ते चार विद्यार्थ्यांनी वर्गावर अध्यापन केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी शाळेचे कार्यलयाचे कामकाज देखील सांभाळले. हे कामकाज कसे चालते ते सर्व समजून घेतले. तर ताणया नेवे या मुलीने मुख्याध्यापिका हे पद देखील भूषवले. याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती आदित्य लेले याने सांगितली. गुरूंनी दिला ज्ञानरुपी वसा हे गीत चौथीतील विद्यार्थ्यांनी सादर केले. शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांच्या स्पर्धा देखील घेण्यात आली. जसे सुईत दोरा ओळणे, सागर गोट्या ,सामान्य ज्ञान, इत्यादी स्पर्धेत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला होता. मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी देसले आणि गौरवी सोनवणे यांनी केले.

Protected Content