मेहरूण येथून कत्तलीसाठी गायी चोरणाऱ्या एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण शेतशिवारातील गोठ्यातून शेतकऱ्याच्या कत्तलीसाठी तीन गायी चोरल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (वय-५२) रा. पाळधी ता.धरणगाव याला एमआयडीसी पोलीसांनी आज बुधवार १६ डिसेंबर रोजी दुपारी अटक केली आहे. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहे. 

सविस्तर माहिती अशी की, दारा इकबाल पिरजादे (वय-२८) रा. पिरजो मोहल्ला, मेहरूण जळगाव हे शेतीचे काम करतात. त्यांच्याकडे शेतीसाठी बैल व गायी आहेत. त्यांचे मेहरूण शिवारात शेत आहे. याच शेतात गोठ्यात गुरांना ठेवण्यात येते. २८ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान आणि २५ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते २६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (वय-५२) रा. पाळधी ता.धरणगाव, वसीम अहमद मोहंमद असलम कुरेशी रा. मालेगाव नाशिक आणि शेख मुहादि शेख जाबीर कुरेशी रा. मासुमावाडी जळगाव यांनी दारा पिरजादे यांच्या शेतातील गोठ्यातून ३९ हजार रूपये किंमतीच्या तीन गायी कत्तल करण्यासाठी (एमएच ०१ बीटी ४२५५) क्रमांकाच्या कारमध्ये चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी दारा पिरजादे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तिन्ही संशयित आरोपी कारसह फरार होते.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना संशयित आरोपी शेख अजगर हा पाळधी गावात असल्याची गोपनिय माहिती मिळाली, त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद सचिन पाटील यांनी संशयित आरोपी शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (वय-५२) याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात जनावरे चोरून नेल्याप्रकरणी भुसावळ, चोपडा, धरणगाव, रामानंदनगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्याच्या ताब्यातील १० हजार रूपये किंमतीची गाय हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित दोन्ही फरारच आहेत.  उद्या संशयित आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

Protected Content