अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे, परंतु शासनाकडून दुर्लक्ष झाले असून त्या मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉ. अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मार्च अखेर महाराष्ट्रव्यापी संपाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले मोबाईल नादुरुस्त झाले असून त्याची बटरी संपली असून कमी जीबीचे आहेत. त्यात नवीन सुधारणा करता येत नसल्याने नव्याने मोबाईल देण्यात यावेत, दरमहा पेन्शन, निर्दोष पोषण आहार ट्रकर अप्लीकेशन, लाभार्थी पोषण आहारात तीन पट वाढ, यासह अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचारी दर्जा देण्यात यावा, या कर्मचाऱ्यांना सेवावर्षानुसार केवळ एकदाच वाढ मिळाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार किमान दरदिवशी साडेतीनशे रुपये मानधनात वाढीसह अन्य न्याय्य मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून त्या मान्य न झाल्यास राज्यावापी संप पुकारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content