यावलच्या तरुणाची नाशिक येथे आत्महत्या

 

यावल :  प्रतिनिधी ।  येथील मूळ रहिवाशी व नाशिक येथे कामानिमित  राहणाऱ्या  तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडती  हे वृत्त कळताच सुतारवाडा परिसरात खळबळ उडाली

 

कृष्णा अढळकर या तरूणाने आत्महत्या केल्याचे कळताच मयताचे कुटुंब नाशिककडे रवाना झाले यावल शहरातील सुतारवाडयातील कृष्णा रामानंद अढळकर (वय२७) हा तरूण १२ वर्षापासुन अंबड ( जि  नाशिक)  येथे औद्योगीक वसाहतीमध्ये एका खाजगी फर्नीचरच्या कंपनीत कामास होता , कृष्णा अढळकर  एकटाच राहात होता त्यांने अंबड शहरातील   घरात गळफास घेवुन आत्महत्या  केल्याचे  त्याच्या शेजाऱ्यांकडुन यावल येथे त्याच्या कुटंबास कळाले मयत तरुण अविवाहीत होता  त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र  कळु शकले नाहीत . कृष्णा अढळकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर  यांचा भाऊ होता

Protected Content