गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षक दिन जल्लोषात साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गुरु बद्दल बोलायचं झालं तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः जसा कुंभार एखाद्या मडक्याला आकार देतो तसा गुरु पण विद्यार्थ्याला घडवत असतो. गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात ५ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी धुरा सांभाळत सकाळच्या सत्रात सर्व तासिका घेतल्या तसेच विविध कामकाजदेखील पाहिले. त्यानंतर दुपारच्या सत्रात कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, समन्वयक प्रा. दीपक झांबरे, अधिष्ठाता प्रा. अतुल बर्‍हाटे, यांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.कैलास माखीजा, विद्युत विभाग प्रमुख प्रा. चेतन विसपुते आणि कम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. शिरीन पिंजारी मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद तथा विद्यार्थी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सरस्वती पूजन व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण  केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ  देऊन स्वागत करण्यात आले .सत्कार समारंभा नंतर प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शिक्षकांप्रती आदर भाव राखण्या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आयोजित कार्यक्रमा बद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गोदावरी तंत्रनिकेतन मध्ये सादर करण्यात आलेल्या शिक्षक दिनानिमित्त प्रथम वर्ष विद्यार्थिनींनी जीवनात शिक्षकाचे महत्व व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  यांच्या बद्दल इंग्रजी मराठी व हिंदी माध्यमांमध्ये माहिती सादर केली. द्वितीय वर्ष कम्प्युटर मधील वेद जैन व त्याचे प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनी नाट्यंकिका सादर केली. प्रथम वर्ष वर्षातील विद्यार्थ्याने गुरुवंदना म्हणून तबला वादन केले.

 

शिक्षक दिनानिमित्त तंत्रनिकेतन समन्वय प्रा. दीपक झांबरे सर व तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्रा. अतुल बर्‍हाटे सर यांनी उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले. तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले त्यात सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला. त्यानंतर सर्व विभाग प्रमुख व इतर शिक्षक वृंद यांनी आपले शिक्षक दिना बद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-प्रथम वर्ष विद्यार्थिनी कृतिका तळेले, शालिनी राय ,कनिष्का सुरवाडे, दुर्गेश चौरे व इतर विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सिमरन कोळी, ग्रीष्मा पाटील व केतकी टिकले द्वितीय वर्ष तंत्रनिकेतन मधील विद्यार्थिनींनी केले.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर तसेच सदस्य डॉ. केतकी ताई पाटील यांनी कौतुक केले.

 

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रा. रोहन पाटील ,प्रा. चंद्रकांत शिंपी ,प्रा. वेणू फिरके, प्रा. दीपेश भुसे यांनी मार्गदर्शन केले तर विद्यार्थी सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Protected Content