जळगावात “भक्तीदीपिका” पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवसाच्या गणपती मंदिर हॉल येथे अल्पवधीतच नावारूपास आलेले आणि भरघोस प्रतिसाद लाभलेले “भक्तीदीपिका” पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प. न. लुंकडं कन्या शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका तथा गीता अभ्यासक आणि संस्कृत श्लोक विश्लेशिका कुंदाताई परांजपे ह्याच्या हस्ते करण्यात आले.

सुरवातीला दिपप्रज्वलंन स्वाती कुलकर्णी, कुंदाताई परांजपे, कविता दातार, मंजुषा राव, रेवती शेंदुर्णीकर ह्याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी ह्यांनी केले.

कार्यक्रमात लॉकडाऊन प्रसंगी आभासी पद्धतीने विविध उपक्रम घेऊन सुरभिला केलेल्या सहकार्याबद्दल संस्कार भारतीच्या गीता रावतोळे ह्यांचा रांगोळी शिबिर तसेच योगा शिक्षिका स्मिता पिले ह्यांनी योगा शिबिर लॉक डाऊन मध्ये घेतले त्याबद्दलआणि आत्ता पर्यँत 17000 स्वेटर स्वतःहा विणून लहान बालकांना वाटप केली. अशा सामाजिक कार्य करणाऱ्या मृणालिनीताई चौगुले ह्यांचा सत्कार अनुक्रमे रेवती शेंदुर्णीकर, विनया भावे, स्वाती कुळकर्णी ह्यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच कविताताई दातार ह्यानी “मोबाईल फोन चा सुरक्षित वापर” ह्या विषयावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. व महिलांनी विचारलेल्या शंकांना उत्तरे दिली. कुंदा परांजपे ह्यांनी “भक्तीदीपिका” पुस्तका विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजुषा राव, सुनीता सातपुते, विनया भावे, साधना दामले, मेघा नाईक, निलीमा नाईक, संजीवनी नांदेडकर, वैदेही नाखरे, माधुरी फडके, सविता नाईक, अश्विनी जोशी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंजुषा राव ह्यांनी मानले.

Protected Content